Recent Posts

=> ग्रामपंचायत कार्यालय, वारंगी, ता. मालेगाव, जि. वाशिम चे संकेतस्थळवर आपले स्वागत आहे...!

:: लोकसेवा ::

जन्म नोंदणी व प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • आई-वडील यांचे आधारकार्ड
  • आशा/अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवाल
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे
प्रक्रिया :
जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.
शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये
वेळ: 7 दिवस
=========================================
मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • मयत व्यक्तीचे आधारकार्ड
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय/पोलीस स्टेशन कागदपत्रे
प्रक्रिया :
मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.
शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये
वेळ: 7 दिवस
=========================================
विवाह नोंदणी व प्रमाणपत्र
विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.
आवश्यक कागदपत्रे:
  • विवाहाचे ज्ञापन
  • वर-वधूचे जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार/मतदार कार्ड/ड्रायविंग लायसन्स
  • रेशन कार्ड/वीजबिल/पासपोर्ट
  • लग्नपत्रिका
  • शपथपत्र
  • लग्नाचे फोटोग्राफ्स
  • पासपोर्ट फोटो (2)
  • तीन साक्षीदार फोटो (2)
  • घटस्फोट आदेश प्रत
  • पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र
प्रक्रिया :
प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची छाननी केली जाते. खात्री झाल्यावर विवाह नोंदणी केली जाते.
शुल्क: विवाह नोंदणी शुल्क 50 ते 200 रुपये, प्रमाणपत्र शुल्क 20 रुपये